Friday 9 June 2023

today marathi news...

 मेटा-इन्स्टाचे अकाऊंट 'या' माध्यमातून व्हेरिफाय होणार?


मेटाने आपली व्हेरिफाइड सेवा भारतात लाँच केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर ब्लू टिक आणि व्हेरिफाइड बॅजसाठी शुल्क द्यावे लागणार आहे. युजर्सला हे सब्सक्रिप्शन आयओएस आणि अँड्रॉइडवर 699 रुपये प्रती महिना शुल्क भरून विकत घेता येणार आहे. मेटा व्हेरिफाइड सर्व्हिसेस अंतर्गत युजर्स सरकारी आयडीच्या माध्यमातून आपले अकाउंट व्हेरिफाय करु शकतात. ट्विटरही ब्लू टिकसाठी शुल्क आकारते.


 देशभरात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता


रशियाने भारताला प्रतिबॅरल 16 डाॅलर सवलतीत कच्च्या तेलाची विक्री केली. त्यामुळे कंपन्या नफ्यात आल्या. म्हणून पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होऊ शकते. एप्रिलमध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 83.76 डाॅलर होती, ती गुरुवारी (8 जून) 74.85 डाॅलर झाली. 2022-23 मध्ये रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केल्याने सरकारचे 3.6 अब्ज डॉलर्स (30 हजार कोटी रुपये) वाचले. त्यामुळे पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, नफ्याचा फायदा जनतेला देण्यासाठी तेल कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे.


कॅनडाच्या जंगलात लागलेल्या वणव्याचा धूर अमेरिकेपर्यंत!


कॅनडाच्या जंगलात लागलेल्या वणव्याचा धूर अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. यामुळे अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. इथे आकाशात पिवळे धुके आहे. धुरामुळे न्यूयॉर्कसह अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये प्रदूषणाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहवालानुसार, शिकागो ते अटलांटा पर्यंत सुमारे 10 कोटी लोक प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. अमेरिकेने 600 अग्निशमन दल कर्मचारी कॅनडात पाठवले. आतापर्यंत सुमारे 38 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र जळून खाक झाले आहे. यामुळे 1 लाख 20 हजारांहून अधिक लोकांना घरे सोडावी लागली आहेत.

Thursday 1 June 2023

Today News in Marathi

 📣 टॉप टेन बुलेटिन्स, 01 जून



1️⃣ अदानी प्रकरणावर काँग्रेसची 100 प्रश्नांची 'हम अदानी के है कौन' पुस्तिका तयार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अदानी-हिंडेनबर्गच्या प्रकरणावरून विचारले 100 प्रश्न


2️⃣ दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, दहावी बोर्डाचा निकाल उद्या (2 जून) दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार


3️⃣ आजपासून नाफेडकडून उन्हाळी कांदा खरेदी; राज्यात 3 लाख मेट्रिक टनची खरेदी होणार; केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची माहीती


4️⃣ ‍देशातील 12 शहरांमध्ये QR आधारित कॉईन वेंडिंग मशीन बसवले जाणार, नाण्यांचे वितरण सुलभ करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार


5️⃣ मुंबई-गोवा महामार्गावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दि. 31 मे ला रात्री 12 वाजेपासून 2 जूनला रात्री 12 वाजेपर्यंत तर 4 जूनला रात्री 12 वाजेपासून ते 6 जूनला रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी


6️⃣ Renault या फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनीबाबत आनंदाची बातमी, कंपनीने 11 वर्षांमध्ये तब्बल 09 लाख गाड्यांची केली विक्री


7️⃣ आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा येत्या 2 जूनला पुण्यात दाखल होणार, उद्या सायंकाळी 6 वाजता सणस मैदानाशेजारी जाहीर सभा होणार


8️⃣ शेअर बाजार: सेन्सेक्स 193 अंकांनी घसरून 62,428.54 अंकांच्या पातळीवर बंद, तर निफ्टी 46 अंकांनी घसरून 18,487.75 अंकांवर बंद


9️⃣ कोकण रेल्वे मार्गावरील बहुचर्चित मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस येत्या 5 जूनपासून धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मडगाव रेल्वे स्थानकावर येत्या 3 जून रोजी सकाळी 10:30 वाजता या गाडीचे उद्घाटन होणार 


🔟 सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 60760 रुपये


💁‍♂️ ब्रेकिंग : प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकालाची तारीख जाहीर, जाणून घ्या कधी लागणार निकाल

Sunday 28 May 2023

Today's Marathi News

 🤝 शरीरातील पाचही बोटांविषयी महत्वपूर्ण माहिती


👉 अंगठा (The Thumb)- आपल्या हाताचा आपल्या फुफुसाशी जोडलेला असतो. जर तुमच्या हृदयाची धडधड वाढली असेल तर अंगठ्याला मसाज करा आणि हळुवार खेचा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.


👉 तर्जनी (The Index Finger)-हे बोट आतड्या gastro intestinal tract सोबत जोडलेले आहे. जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या बोटाला हळुवार चोळा यामुळे वेदना गायब होईल.


👉 मध्यमा (The Middle Finger)- हे बोट अभिसरण तंत्र circulation system सोबत जोडलेली आहे. जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा जीव घाबरत असेल तर या बोटाला मालिश करा तुम्हाला त्वरित आराम मिळेल.


👉 अनामिका (The Ring Finger)- हे बोट तुमच्या मनस्थिती सोबत जोडलेले आहे. जर काही कारणामुळे तुमची मनस्थिती चांगली नाही आहे तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि खेचा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल आणि तुमचा मूड चांगला होईल.


👉 करंगळी (The Little Finger)- करंगळीचा संबंध किडनी आणि डोक्या सोबत असतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर या बोटाला हळूहळू मालिश करा आणि दाबा. तुमची डोकेदुखी निघून जाईल. या बोटाला मालिश केल्याने किडनी देखील निरोगी राहते.

➖➖➖➖➖➖➖➖➖

😱 राज्यातील 10वी च्या परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार..!! बोर्डाने दिली महत्वाची माहिती



newspower11.com/maharashtra/hsc-result-announced-date-ssc-result-2023/

Sunday 21 May 2023

Today News in Marathi

 👰‍♀️ एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा


▪️मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. सामूहिक विवाह करणाऱ्या जोडप्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत 10,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवली जाईल असे एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्यातील एका सामूहिक विवाह सोहळ्यात बोलताना म्हटले आहे. त्यांच्या उपस्थितीत किमान 325 जोडप्यांनी लग्नगाठ बांधली. लोकांना मोठे विवाह परवडत नसल्यामुळे सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.


💁‍♂️ भारत क्वाड समिटचे यजमानपद भूषवणार'


▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जपानमधील हिरोशिमा येथे क्वाड देशांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी पीएम मोदींनी मोठी घोषणा केली. 'भारत 2024 मध्ये क्वाड समिटचे यजमानपद भूषवणार आहे. 2024 मध्ये भारतात क्वाड समिट आयोजित करण्यात आम्हाला आनंद होईल असे मोदी म्हणाले. इंडो-पॅसिफिकमध्ये शांतता, स्थिरता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी क्वाड ग्रुपिंग हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

 

🌧️ राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकार!


▪️राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने कहर केला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील रापापुर इथे तुफान वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तर तुफान वाऱ्यामुळे 35 हून अधिक आदिवासी कुटुंबांचे घरांचे नुकसान झालं आहे. घरावर असलेले पत्रे, छतदेखील उडाले आहेत. त्यातच घरात साठवून ठेवलेले धान्य इतर संसार उपयोगी वस्तू हे पूर्ण पाण्यात भिजली आहेत.

 

😱 बराक ओबामांना रशियात नो एन्ट्री


▪️रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरु असल्याने अमेरिकेने रशियावर निर्बंध लागू केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने 500 अमेरिकन नागरिकांना रशियात येण्यावर बंदी घातली आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, कॉमेडियन स्टीफन कोलबर्ट, टीव्ही होस्ट जिमी किमेल, कॉमेडियन सेठ मायर्स, सीएनएन अँकर एरिन बर्नेट यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या संसदेतील सदस्यांनाही रशियात एन्ट्री मिळणार नाही.


🏏चेन्नईची प्लेऑफमध्ये 12 वी धडक


▪️आयपीएलमध्ये दिल्लीत झालेला सामना चेन्नई सुपर किंग्सने जिंकला. दिल्लीला तब्बल 77 धावांनी पराभूत करत चेन्नईने यंदाच्या स्पर्धेतील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. या विजयामुळे चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचणारी दुसरी टीम ठरली आहे. याआधी गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री केली आहे. दरम्यान अंतिम चार संघांमध्ये पोहोचण्याची चेन्नईची ही बारावी वेळ आहे. तर चेन्नई दोनदा प्लेऑफ आधीच स्पर्धेतून बाहेर पडली होती.

Tuesday 16 May 2023

Daily News in Marathi

 📣 टॉप टेन बुलेटिन्स, 16 मे 2023




1️⃣ राज्यातील विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल- राज्यपाल रमेश बैस


2️⃣ बेदरकारपणे वाहनं चालवणारे, परवाना नसणारे, मद्यपान करून गाड्या चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


3️⃣ व्होडाफोनचा कर्मचाऱ्यांना झटका देणारा निर्णय, कंपनी पुढील 3 वर्षात तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार


4️⃣ संजय राऊत यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव सादर; शिंदे गटाचे आमदार शिरसाटांचे गंभीर आरोप


5️⃣ बारसू रिफायनरी आंदोलनाबाबत महत्वाची अपडेट, आंदोलनकर्ते व राजू शेट्टी यांच्यासह राजकीय नेत्यांना बजावण्यात आलेले मनाई आदेश मागे


6️⃣ नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेतली जावी; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश


7️⃣ राज्यातील चर्चित अशा समृद्धी महामार्गावर नियमांचा भंग, मागील 5 महिन्यामध्ये सुमारे 1381 वाहन चालकांना ठोठावण्यात आला दंड


8️⃣ “राजकारण करणं पीएचं काम व्हय का?” आमदार केचेंची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘पीएं’वर टीका; ऑडियोने खळबळ


9️⃣ शेअर बाजार: सेन्सेक्स 413 अंकांनी घसरून 61,932.47 अंकांवर बंद, तर निफ्टी 112 अंकांनी आपटत 18,286.50 अंकांवर बंद


🔟 सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 56750 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 61910 रुपये



Today marathi news

 📣 टॉप टेन बुलेटिन्स, 15 मे



1️⃣ पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 5000 विशेष गाड्या (बसेस) सोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एसटी महामंडळाला निर्देश


2️⃣ HDFC बँक-HDFC हाऊसिंग फायनान्स कंपनीचं विलीनीकरण होणार, येत्या जून 2023 पर्यंत विलीनीकरण पूर्ण होण्याची शक्यता


3️⃣ महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न, कोणाची तरी फूस; दंगेखोरांना अद्दल घडवणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


4️⃣ इन्फोसिसने सध्याच्या बाजारभावानुसार 64 कोटी रुपयांच्या शेअर्सचे कर्मचाऱ्यांना दिले गिफ्ट, तब्बल 5,11,862 इक्विटी शेअर्सचे केले वाटप


5️⃣ केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या जारी, तर राज्य शासनाचे dycommr.enf1@gmail.com या ई-मेलद्वारे 20 मेपर्यंत अभिप्राय कळविण्याचे नागरिकांना आवाहन


6️⃣ खडकवासला धरणात बुडून दोन मुलींचा मृत्यू, लग्नानिमित्त बुलढाण्यावरुन आलेल्या नऊही मुली कपडे धुत असताना बुडाल्या होत्या खडकवासला धरणात 


7️⃣ पुणेकरांना लवकरच खास केशरची चव चाखता येणार, गुजरातचा आंबा मार्केटमध्ये दाखल


8️⃣ दिलासा: सलग 11 व्या महिन्यात कमी झाला घाऊक महागाई दर; एप्रिलमध्ये -0.92% पर्यंत खाली, मार्चमध्ये होता 1.34%


9️⃣ उपाध्यक्षांकडे अध्यक्षांचे अधिकार येत नाही, उपाध्यक्षांना त्यांचे निर्णय चांगले माहिती, विलंब न करता आणि घाई न करता निर्णय घ्यायचा आहे : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर


🔟 सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 56650 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 61800 रुपये



Sunday 14 May 2023

Today News in Marathi

 📣 टॉप एट बुलेटिन्स, 14 मे




1️⃣ समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ करणार लवकरच मोठी घोषणा


2️⃣ मातृदिनाच्या दिवशीच पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात स्त्री भ्रूणहत्येचा प्रकार उघड 


3️⃣ महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय


4️⃣ अधिकाऱ्यांना सरकारच्या आदेशच पालन न करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी खा. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल


5️⃣ कर्नाटकात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, सुशीलकुमार शिंदे बजावणार निरीक्षकाची भूमिका.


6️⃣ मराठा समाजाला 6 महिन्यात टिकाऊ आरक्षण द्या, तानाजी सावंत यांचं सरकारला आवाहन.


7️⃣ फक्त 59 धावांत गारद, लाजीरवाण्या पराभवानंतर राजस्थानच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद


8️⃣ कर्नाटकात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, सुशीलकुमार शिंदे बजावणार निरीक्षकाची भूमिका.



today marathi news...

  मेटा-इन्स्टाचे अकाऊंट 'या' माध्यमातून व्हेरिफाय होणार? मेटाने आपली व्हेरिफाइड सेवा भारतात लाँच केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना फे...